माजी आमदार अशोकदादा काळे यांनी त्यांचे वडील माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांचा समाजकारणाचा वसा पुढे चालवत तालुक्याच्या विकासात मोठ्या प्रमाणात योगदान दिले. सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी काम करण्याची त्यांची बांधिलकी बघून जनतेने त्यांना २ वेळा आमदार होण्याची संधी दिली. सन २००४ ते २०१४ मध्ये कोपरगाव तालुक्याचे आमदार राहिले. कोपरगाव तालुक्याचा विकास साधतांना कोपरगाव शहर आणि तालुक्याचा ग्रामीण भाग एकमेकाना जोडून कसा विकास साधता येईल या विचारातून माजी आमदार अशोकराव काळे यांनी आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले गोदावरी नदीवरील पुलांचे काम पूर्ण करून कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भाग शहराला जोडून फक्त कोपरगाव शहराची बाजारपेठच फुलविली नाही तर शहर आणि ग्रामीण भागातील माणूस एकमेकाना जोडण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.
कोपरगाव येथे जाण्यासाठी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांतील जनतेला पावसाळ्यात आपली कोपरगाव शहरातील कामे जवळपास बंदच ठेवावी लागत असे. कारण पावसाळ्यात गोदावरी नदीला पाणी असल्यास चासनळी, देर्डे चांदवड व धारणगाव-कुंभारी येथील गोदावरी नदी पार करून जावे लागत असे. परंतु नदीला पाणी असल्यास हे मार्ग कायमस्वरूपी बंद राहत असे. याचा परिणाम कोपरगाव शहरातील बाजारपेठ ओस पडत असे. हि अडचण लक्षात घेवून माजी आमदार अशोकदादा काळे यानी कोपरगाव तालुक्यात विविध ठिकाणी गोदावरी नदीवर पूल बांधून जनतेची अडचण दूर करीत कोपरगावची बाजारपेठ फुलविण्याचे काम केले.
यामध्ये कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील पूल, धारणगाव–कुंभारी येथील गोदावरी नदीवरील पूल, वारी येथील गोदावरी नदीवरील पूल, कोपरगाव शहरातील अहमदनगर- मनमाड महामार्गावरील समांतर पूल, कोपरगाव शहर आणि बेट भागाला जोडणारा पूल.
ब्रिटीशांच्या काळात बांधलेले तहसील कार्यालय या कार्यालयात ठेवलेले कैदी अनेकवेळा या इमारतीतून पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाले, हि अडचण ओळखून तहसील कार्यालयाची जुनी इमारत पाडून नवीन तहसील संकुलाचे काम पूर्ण केले. कोपरगाव न्यायालयाच्या नवीन सुसज्ज इमारतीचे काम, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाची इमारत, पशु चिकित्सालयाच्या इमारतीचे काम तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गोदावरी कालवे व चा-यांची दुरुस्ती त्यांनी केली.
पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे वळविण्यासाठी तसेच गोदावरी कालव्यांचे नूतनीकरण व निळवंडे कालवे होण्यासाठी तसेच बारमाही ब्लॉकचे क्षेत्र कायम ठेवून हक्काचे ११ व सध्याचे १३ टीएमसी पाणी मिळविण्यासाठी न्यायालयीन लढाई अंतिम टप्यात आहे.
बायोडेटा
१. संपुर्ण नाव : अशोक शंकरराव काळे
२. पत्ता : मु.पो.माहेगांव देशमुख, ‘राधासदन ‘,ता.कोपरगाव,
जिल्हा- अहमदनगर(महाराष्ट्र राज्य).
पिन कोड नंबर – ४२३६०२.
३. दुरध्वनी : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि.,
गौतमनगर, पो.कोळपेवाडी,ता.कोपरगाव,जि.अहमदनगर
ऑफिस – ०२४२३ -२६१२१० ते २६१२१५
फॅक्स नंबर – ०२४२३ – २६१२१९
४. जन्मदिनांक : दिनांक २१ ऑगस्ट १९५३
५. शिक्षण : बी.ए. (ऑनर्स), एम.बी.ए.(मार्केटींग)
६. व्यवसाय : शेती व सामाजिक कार्यकर्ता.
७. पत्नीचे नाव : सौ.पुष्पा अशोकराव काळे
८. मुले : चि.अभिषेक व चि.आशुतोष काळे
चि.सौ.डॉ.मेघना देशमुख(मुलगी) (इंग्लंडमध्ये वास्तव्य)
भुषविलेली पदे
१.विधानसभा सदस्य : सन २००४ ते २०१४ २३५,कोपरगाव विधानसभा मतदारसंघ, विधानसभा सदस्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२.उपाध्यक्ष : महाराष्ट्र डिस्टीलर्स असोसिएशन,मुंबई.
३.गव्हर्निंग कौन्सिल सदस्य : वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट,मांजरी बुद्रुक,ता.हवेली, जिल्हा पुणे.
४.चेअरमन : कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि., गौतमनगर,पो.कोळपेवाडी,ता.कोपरगाव, जिल्हा – अहमदनगर.
५.मॅनेजिंग कौन्सिल सदस्य : रयत शिक्षण संस्था ,सातारा.
६.संचालक : दि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., स्टेशन रोड, अहमदनगर.
७.चेअरमन : गौतम सहकारी बँक लि.,गौतमनगर, पो.कोळपेवाडी,ता.कोपरगाव,जिल्हा अहमदनगर.
८.अध्यक्ष : महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्र्स्ट कोपरगाव, ता.कोपरगाव,जिल्हा अहमदनगर.
९.चेअरमन : कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी, गौतमनगर,पो.कोळपेवाडी,ता.कोपरगाव,
जिल्हा अहमदनगर.
१०.संचालक : गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा.लि.,गौतमनगर पो.कोळपेवाडी,ता.कोपरगाव,
जिल्हा अहमदनगर.
११.संचालक : गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा.लि.,गौतमनगर पो.कोळपेवाडी,ता.कोपरगाव,
जिल्हा अहमदनगर.
१२.संचालक : कोपरगाव तालुका सहकारी कापुस जिनींग अँड प्रेसिंग सोसायटी लि.,
पो. शिंगणापुर,ता.कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.
१३.संचालक : शरदराव पवार नागरी सहकारी पंतसंस्था मर्यादित, गौतमनगर, पो.कोळपेवाडी, .कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.
१४.संचालक : माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., माहेगाव देशमुख,ता.कोपरगाव, जिल्हा अहमदनगर .
१५.प्रतिनिधी(मजुर व कामगाव व्यवस्थापन समिती) : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित साखर भवन, नरीमन पॉईन्ट ,मुंबई २१.
१६.प्रतिनीधी(कार्यकारी मंडळ सदस्य) : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित साखर भवन नरीमन पॉईन्ट, मुंबई २१.
१७.चेअरमन (स्थानिक व्यवस्थापन समिती) : रयत शिक्षण संस्थेचे,श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळपेवाडी,ता.कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.
१८.सदस्य (स्थानिक व्यवस्थापन समिती) : रयत शिक्षण संस्थेचे, राधाबाई काळे कन्या विद्यामंदीर व कनिष्ठ महाविद्यालय, कोळपेवाडी,ता.कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.
१९.सदस्य (स्थानिक व्यवस्थापन समिती) : रयत शिक्षण संस्थेचे, श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय, गौतमनगर,पो.कोळपेवाडी,ता.कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.
२०.सदस्य (स्थानिक व्यवस्थापन समिती) : रयत शिक्षण संस्थेचे, श्री सदगुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस व संजीवनी कॉमर्स कॉलेज,कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.
२१.विश्वस्त (ट्रस्टी) : ग्रामीण अवर्षणप्रवण क्षेत्र विकास संस्था खडकेवाके संचालित सौ.सुशिलामाई काळे माध्यमिक विद्यालय,उक्कडगाव, ता.कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.
२२.विश्वस्त : श्री हनुमान देव श्री देवराम काळे संस्थान,माहेगाव देशमुख, ता.कोपरगाव, जिल्हा अहमदनगर.
Created with
HTML Maker